चोरीच्या १२ दुचाकींसह ३ जणांच्या मुसक्या आवळल्या; भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यासह बुलढाणा जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात ३ संशयित आरोपींना भुसावळ आणि जळगाव जामोद येथून अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या १२ दुचाकी हस्तगत करण्यात यश आले आहे. तिघांवर बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एकाची दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणात २५ जून रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी आहे भुसावळ शहर परिसरात असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाले त्या अनुषंगाने पोलिसांनी गोपनीय माहितीनुसार संशयित आरोपी शेख बासीद शेख बाबु (वय-२८, रा. सुलतानरपुरा जळगाव जामोद जि. बुलढाणा हल्ली मुक्काम मोहम्मदी नगर भुसावळ), मोहम्मद अयाज मोहम्मद एजाज (वय-२५, रा. सुलतानपुरा जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा), आणि रविंद्र अंबादास घोडसे (वय-४८, रा. पळसोडा ता. संग्रामपुर जि. बुलढाना)
यांना अटक केली त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली शिवाय त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी भुसावळ, जळगांव जामोद जि. बुलढाणा, बुन्हाणपुर मध्य प्रदेश व इतर ठिकाणाहून दुचाकी चोरी केल्याबाबतची कबुली दिली. तीनही संशयित आरोपींकडून ४ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या १२ मोटरसायकली जप्त करण्यात आले आहेत

Protected Content