Home क्राईम भ्रष्टाचार प्रकरण ; आणखी दोघांना रात्री अटक

भ्रष्टाचार प्रकरण ; आणखी दोघांना रात्री अटक

0
81


रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  रावेर पंचायत समिती मधील वयक्तीक शौचालय योजनेत झालेले भ्रष्ट्राचार प्रकरणी पोलिसांनी रात्री अजुन दोन आरोपींना खिरोदा प्र रावेर व खिरवळ येथून अटक केली असून एकूण आरोपींची संख्या दहावर गेली आहे.

 

बहुचर्चीत शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचाऱ प्रकरणात आरोपींची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर दूसरीकडे तपासाचे चक्र वेगाने फिरत आहे. काल दिवसभर येथील गट विकास अधिकारी यांचा जबाब घेण्यात आले तर सायंकाळी काही बँक अधिका-यांची देखिल चौकशी तपास अधिकारी शितलकुमार नाईक यांनी केली आहे. काल रात्री खिरोदा प्र रावेर येथून सतीष वामनराव पाटील तर ख़िरवळ येथून महेंद्र बिसन गाढे याला ताब्यात घेण्यात आले असून एकूण आरोपींचीं संख्या दहा वर पोहचली आहे.


Protected Content

Play sound