महाराष्ट्रातील ‘या’ विधानसभेच्या जागेवर होणार पोटनिवडणूक

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशातील लोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा देखील आज १६ मार्च रोजी निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. २६ एप्रिल रोजी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. तर या मतदारसंघाचा निकाल लोकसभेच्या निवडणूकीच्या निकालांसोबतच ४ जूनला लागणार आहे.

या मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन झाले होते. त्यामुळे ही जागा रिक्त होती. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागेवर पोटनिवडणूक कधी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, आता निवडणूक आयोगाच्या वतीने देशभरातील सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली.

Protected Content