नवनियुक्त खासदार स्मिता वाघ यांचे अमळनेरात जंगी स्वागत होणार

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव लोकसभेच्या नवनियुक्त खासदार स्मिता वाघ यांचे उद्या बुधवार १२ रोजी अमळनेरात आगमन होणार असून, खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच स्मिताताई वाघ या तालुक्यात येत आहेत. यावेळी तालुक्यातील नागरिकांकडून खासदार स्मिताताई वाघ यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार असून विजयी रॅली काढण्यात येणार आहे.

दुपारी ३ वाजता पैलाड नाका येथून रॅली ला सुरवात होणार असून पुढे दगडी दरवाजा-बसस्थानक-महाराणा प्रताप चौक मार्गे धुळे रस्त्यावरील स्व. उदय वाघ यांचे स्मारकाजवळ रॅलीचा समारोप होणार आहे.यावेळी सर्व अमळनेर मतदारसंघातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन महायुती तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.५४२ कोटी रूपये मिळाले आहे.

Protected Content