पुण्यात १० मे रोजी होणार राज ठाकरे यांची सभा

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पीएम नरेंद्र मोदींसाठी महायुतीला पाठिंबा दिला आहे.. त्यानंतर त्यांनी भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ कणकवली येथे सभाही घेतली. आता पुण्यातही राज ठाकरे यांची सभा होणार आहे.

पुण्यात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यात राज ठाकरे यांची सभा होणार आहे. ही सभा १० मे रोजी होईल ही माहिती मिळाली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपने पुण्याचे माजी महापौर असलेल्या मुरलीधर मोहोळ यांना मैदानात उतरवले आहे. शिवाय, पुण्यात राज ठाकरेंची साथ सोडत वंचितकडून उमेदवारी मिळवलेले वसंत मोरेही रिंगणात आहेत.

Protected Content