अवैधपणे गुटखा व सुगंधीत तंबाखूची वाहतूक; साडेपाच लाखांचा ऐवज जप्त

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधीत तंबाखूची अवैधपणे वाहतूक करणारे वाहनावर चाळीसगाव शहर पोलीसांनी सोमवार १० जून रोजी दुपारी ३ वाजता चाळीसगाव तालुक्यातील वाघडू गावात कारवाई केली. पोलीसांनी एकुण ५ लाख ५६ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी रात्री १० वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

चाळीसगाव तालुक्यातील वाघडू गावात प्रविण सुरेश पाटील हा आपल्या फायद्यासाठी प्रतिबंधीत असलेला गुटखा व सुगंधित तंबाखूची वाहतूक करत असल्याची माहिती चाळीसगाव शहर पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी सोमवार १० जून रोजी दुपारी ३ वाजता कारवाई केली. यावेळी वाहन क्रमांक (एमएच १९ सीवाय ६७४३) या वाहनातून वाहतूक करून घरात साठवणूक करत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी पोलीसांनी गुटखा व सुगंधित तंबाखूसह वाहन असा एकुण ५ लाख ५६ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्टेबल राहूल सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रविण सुरेश सोनवणे यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले हे करीत आहे.

Protected Content