धरणगावात नवनिर्वाचित नगराध्यक्ष उद्या पदभार स्वीकारणार !

nilesh chaudhari 1 1

धरणगाव, प्रतिनिधी | येथील नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी, हे उद्या (दि.२) सकाळी १०.०० वाजता आपला पदभार स्वीकारणार असून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ना. गुलाबराव पाटील, काँग्रेसचे प्रदेश सचिव डी.जी. पाटील व शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ हे उपस्थित राहणार आहेत.

 

या कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन प्रभारी नगराध्यक्षा सौ. अंजली भानुदास विसावे, सर्व नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी यांनी केले आहे.

Protected Content