पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळयात भव्य आणि दिव्य असे श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आलेला आहे. सिहोर’चे रुद्राक्षचेही होणार वाटप पारोळा येथील भवानी गड संस्थानतर्फे २८ फेब्रुवारी ते ५ मार्च दरम्यान श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. ७ दिवस हर-हर महादेवाचा अखंड गजर होणार असून सिहोरचे रुद्राक्षचेही वाटप करण्यात येणार आहे. भवानी गड संस्थानतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन सातत्याने करण्यात येत असते.
त्याचाच एक भाग म्हणून २८ फेब्रुवारी पासून संगीतमय श्री शिव महापुराण कथेचे आयोजन भवानी गड येथे सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजे दरम्यान करण्यात आले आहे. भवानी गडाचे विश्वस्त डॉ. मंगेश तांबे यांच्या सुमधुर वाणीतून भाविकांना ही कथाश्रवण करता येणार आहे. ५ मार्च रोजी रात्री ८ वाजता महाप्रसादाचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. सर्व शिव भक्तांनी संगीतमय श्री शिव महापुराण कथेचा व महाप्रसदाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री भवानी गड अन्नदान व उत्सव समिती, श्री सेवा मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे. श्री भवानी गड येथील श्री शिव महापुराण कथेचे रुद्राक्ष मनी वाटप करण्यात येणार आहेत. श्री क्षेत्र कुबेश्वर धाम यातून भवानी गड आणि श्री सेवा मित्र परिवारातील सदस्य यांनी विधिवत आशीर्वाद घेऊन रुद्राक्ष ताब्यात घेतले आहे असे श्री भवानी गड संस्थानाचे अध्यक्ष डॉ मंगेश तांबे यांनी सांगितले.
भवानी गड येथे श्री शिव महापुराण कथेचे २८ फेब्रुवारी ते ५ मार्च दरम्यान आयोजन
10 months ago
No Comments