आर्थिक वादामुळे डॉक्टरांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिक येथील पंचवटीतील सुयोग हॉस्पीटलचे डॉ. कैलास राठी‎ यांच्यावर एका व्यक्तीने जीवघेणा हल्ला केला. हा ‎‎प्रकार २३ फेब्रुवारी रोजी रात्री‎‎ ९.३० वाजता ‎‎घडला. या‎‎ हल्ल्यात डॉ. कैलास राठी ‎‎‎गंभीर जखमी‎ झाले आहे. त्यांच्यावर खासगी ‎रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा हल्ला हॉस्पीटलमधील जनसंपर्क अधिकारी असलेल्या ‎महिलेच्या पतीने आर्थिक वादातून केल्याची माहिती पोलिसांनी‎ दिली. पंचवटी पोलिस ‎ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत ‎सुरू होते.‎

या घटनेप्रकरणी पोलिसांनी दिलेली ‎माहिती अशी की, पंचवटीतील सुयोग हॉस्पीटलचे संचालक डॉ. कैलास राठी‎ यांच्या जनसंपर्क विभागात २०२२ मध्ये रोहिणी‎ दाते या जनसंपर्क अधिकारी‎ म्हणून कामास होत्या. त्यांचा पती‎ राजेंद्र मोरे हा २०२२ मध्ये हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल झाला होता.‎ तेव्हापासून संशयित डॉ. राठी यांच्या संपर्कात होता. संशयिताशी ओळख वाढल्याने डॉ. राठी यांनी म्हसरुळ परिसरात प्लॉटचा‎ व्यवहार केला होता. या प्लॉटच्या व्यवहारामुळे संशयिताशी दोन‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ वर्षांपासून डॉ. राठी यांचा आर्थिक वाद सुरू होता. संशयित मोरे याच्याकडे डॉ. राठी यांनी पैशांचा तगादा लावला होता. त्यामुळे डॉ. राठी यांच्याशी संशयित मोरे हॉस्पीटलमध्ये चर्चेसाठी आला होता. हॉस्पीटलमध्ये डॉ. राठी यांच्या केबिनमध्ये चर्चा करताना दोघांमध्ये वाद झाला, दरम्याने संशयिताने कमरेला लावलेला कोयता काढत डॉ.राठी यांच्यावर सपासप सोळा वार केले. राठी यांनी मदतीकरिता आराडाओरड केली असता केबिनचा दरवाजा आतून बंद असल्याने हॉस्पीटलमधील कर्मचारी काहीही करू शकले नाही. संशयिताने केबिनचा दरवाजा उघडून पलायन केला. त्यानंतर डॉ. राठी यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Protected Content