वीजेच्या खंब्यावरून पडलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मोहाडी गावातील विजेच्या खांबावरील लाईट दुरुस्त करण्यासाठी चढलेला तरुणाचा शॉक लागून खाली कोसळून जखमी झालेल्या तरूणाचा मंगळवारी ४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चंद्रकांत दत्तात्रय ठाकरे (वय-२३, रा. मोहाडी) असे मयत तरुणाच नाव आहे.

याबाबत अधिक असे की, चंद्रकांत ठाकरे हा तरूण आपल्या कुटुंबियांसह जळगाव तालुक्यातील मोहाडी येथे वास्तव्याला आहे. चंद्रकांत हा मोहाडी ग्रामपंचायत कार्यालयात पाणी पुरवठा विभागात नोकरीला होता. २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता गावातील विजेचा खांब्यावरील लाईट बंद असल्याने चंद्रकांत खंब्यावर चढला. बंद लाईट दुरूस्त करत असतांना त्याला विजेचा जोरदार धक्का बसून खाली कोसळल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला जळगाव शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मंगळवारी ४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content