बापरे ! मातेने चिमुकलीसह स्वत:ला संपविले : परिसर हादरला

अमळनेर-गजानन पाटील | तालुक्यातील नीम येथे आज एका महिलेने आपल्या मुलीसह आत्मघात केल्याने परिसर हादरला आहे.

अमळनेर तालुक्यातील कळमसरे शिवारात निम येथील रहिवासी असलेल्या माय लेकींनी विहिरीत आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. कळमसरे येथील सबस्टेशन च्या हाकेच्या अंतरावर निम रस्त्यालगत असलेल्या विहिरीत दोघांचा मृतदेह तरंगत असल्याने घटना उघडकीस आली.याबाबत मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

निम ता.अमळनेर येथील रहिवासी जयश्री समाधान कोळी (वय ३० वर्ष ) व त्यांची मुलगी नंदिनी समाधान कोळी ( वय ७वर्ष ) ह्या दोन्ही मायलेकींनी आज दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास कळमसरे शिवारातील सबस्टेशन जवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

पोलीस घटनास्थळी आल्यावर नागरिकांनी दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले.मारवड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.याबाबत मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयेश खलाने करीत आहेत.

दरम्यान, आत्महत्या केलेल्या जयश्री कोळी ह्या आज बराच वेळ आपल्या मुलीसह कळमसरेत वावरत असताना अनेकांच्या नजरेस पडल्या.त्या आपल्या निम गावी पायी जाण्यासाठी निघाल्याने कळमसरे येथील काही महिलांनी त्यांची विचारपूस केल्याचेही चर्चा गावात होती.परंतु गाडी नसल्याचे कारण पुढे करीत त्यांनी निम गावाकडे पायीच आगेकूच केली.आणि आपल्या सात वर्षाच्या मुलीसह मृत्यूला कवटाळले.जयश्री यांचे पती मोलमजुरी करतात त्यांच्या सासूबाई दर्शनासाठी सप्तश्रृंगी गडावर गेल्या होत्या.तर चार वर्षाचा मुलगा हा आजोबांकडे होता.मायलेकीच्या आत्महत्येने संपूर्ण पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.

Protected Content