उत्तराखंडात बस दरीमध्ये कोसळली

पौडी-वृत्तसंस्था | उत्तराखंडातील पौडी गढवाल जिल्ह्यात बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात २५ पेक्षा जास्त प्रवासी ठार झाले आहेत.

उत्तराखंडच्या पौडी गढवाल जिल्ह्यातील सिमडी गावाजवळ रिखनिखल-बिरोखल रस्त्यावर असणार्‍या एका दरीत काल मध्यरात्रीच्या सुमारास बस कोसळली. बसमध्ये सुमारे ५० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

दरम्यना, या भीषण अपघातात २५ पेक्षा जास्त प्रवासी जागीच ठार झाले असून अन्य जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Protected Content