भाजपा अल्पसंख्याक मोर्चा (जैन) च्या प्रदेश सह प्रमुखपदी सुशिल टाटीया

 

चोपडा, प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या महाराष्ट्र उप प्रदेश प्रमुख पदी चोपडा येथील सामाजिक कार्यकर्ते सुशिल टाटीया यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष एजाज देशमुख यांच्या निर्देशानुसार नवनिर्वाचित प्रदेश प्रमुख संदीप भंडारी यांनी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना ही निवड जाहीर केली. सुशिल टाटीया हे अनेक स्थानिक ते राज्यस्तरीय तसेच अखिल भारतीय स्तरावरील सामाजिक संस्थांच्या माध्यमातून क्रियाशील आहेत. आंतरराष्ट्रीय युवक चळवळ रोटरँक्ट क्लबचे प्रांतपाल, अखिल भारतीय सुधर्म नवयुवक मंडळाचे महामंत्री, नॅशनल वेजिटेरीयन फौंडेशनचे सचिव अशा अनेक पदावर त्यांनी कार्याचा ठसा उमटविला आहे. अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून सध्या ते काम पाहत आहेत. आर्य शाकाहार संस्कृती अभियानच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर अहिंसा आणि जीवदया क्षेत्रात भरीव कामगिरी केले आहे. सदर निवडी बद्दल महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी, राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी, भाजप प्रदेश व जिल्हा पदाधिकारी तसेच चोपडा तालुका प्रमुख शहराध्यक्ष गजेंद्र जैस्वाल, विभागीय ओबीसी सेल प्रमुख प्रदीप पाटील तालुकाध्यक्ष पंकज पाटील आदींनी अभिनंदन केले आहे. पूर्व संघपति सोहनराज टाटीया, संघपति सुभाषचंद्र बरडिया व गुलाबचंद देसरडा यांनी तसेच राष्ट्रीय अध्यक्ष गौतमजी मालू, केन्रीय कार्य पदाधिकारी मनोज रेदासनी, संजय सिसोदिया, ललित खिंवसरा, सुमती लोढा आदिंनी कौतुक केले आहे. शहरातील कार्यत्पर टीम या विनोद टाटीया, जितेन्द्र बोथरा, संजय श्रावगी, तेजस जैन, लतीश जैन, सुनिल बरडिया यांच्या टीमचे त्यांना सहकार्य मिळते. महत्त्वाच्या पदाच्या माध्यमातून स्वधर्मी वात्सल्याचे काम तळागाळातील समाजघटकां पावेतो पोचवण्यासाठी कृतसंकल्प असल्याचे सूतोवाच श्री. टाटीया यांनी केले आहे.

Protected Content