Home धर्म-समाज शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटविला ; शिवभक्तांमध्ये संतापाची लाट

शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटविला ; शिवभक्तांमध्ये संतापाची लाट


कोल्हापूर (वृत्तसंस्था) बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आल्यामुळे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

 

बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, पुतळा हटवण्यासाठी पोलिसांनी दबाब आणला होता. मनगुत्ती येथील नागरिक यासाठी रस्त्यावर उतरले होते. मनगुत्ती ग्रामपंचायतीच्या परवानगीने शिवाजी महाराजांच्या पुतळा बसवण्यात आला आहे. मात्र, आता हाच पुतळा कर्नाटक सरकारने हटवला आहे. सरकारच्या आदेशानंतर रातोरात पोलिस बंदोबस्तात पुतळा हटवण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.


Protected Content

Play sound