सावखेडासिम येथे रॅपिड एंटीजन टेस्ट तपासणी शिबिर

यावल, प्रतिनिधी । ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी तालुका आरोग्य विभागाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात तालुक्यातील दहिगाव येथील व्यवसायिक व्यक्ती , खाजगी डॉक्टरांकडून मिळालेले संशयित रुग्ण , तसेच comorbid प्रतिकारशक्ती कमी असलेले अशा सर्व व्यक्तींचे तालुक्यातील सर्व प्रा. आ. केंद्रांनी दररोज ५० स्वॅब घेऊन कोविड-19 चा संसर्ग वाढणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना ता. आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे यांनी केलेल्या आहेत.

वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. आ. केंद्र सावखेडासिम कार्यक्षेत्रातील गावांमध्ये स्वॅब तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. आज सावखेडासिम येथे प्रा. आ. केंद्रात व्यावसायिकांसाठी स्वॅब तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.व्यवसायात काम करताना व्यवसायिक व्यक्तींचा अनेक व्यक्तींशी संपर्क येत असतो. म्हणून वस्तू व सेवा देणारी दुकाने जसे की, किराणा दुकान , स्वस्त धान्य दुकान ,कापड दुकान ,भाजीपाला विक्रेते ,फळविक्रेते , मास विक्रेते , दुध संकलन केंद्र , बँक , पोस्ट ऑफिस , दवाखाने (खा. डॉ.) झेरॉक्स सेंटर , मोबाईल रिचार्ज, बेकरी , हॉटेल, खानावळवाले , पाणटपरी , पिठाची गिरणी , व सलून कारागीर तसेच गावात असलेल्या इतर सर्व व्यवसायिकांचे गावातील आशा सेविका यांनी सर्वेक्षण करून, नोंद घेऊन त्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे व वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. आ. केंद्र सावखेडासिम येथे २५ व्यक्तींचे स्वॅब घेऊन रॅपिड एंटीजन टेस्ट करण्यात आले. व काही वेळेतच त्यांचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. २५ व्यक्ती पैकी ५ व्यक्ती ह्या यावल येथील एकात्मिक बालविकास कार्यालयातील कर्मचारी होते. २५ पैकी एक ४१ वर्षीय व्यक्ती यावल येथील एकात्मिक बाल विकास कार्यालयातील कर्मचारी व जळगाव येथील रहिवासी पॉझिटिव आलेली असून अन्य २४ व्यक्तींचे टेस्ट ह्या निगेटिव्ह आलेल्या आहेत. स्वॅब वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे यांनी घेतले व त्यांना अरविंद जाधव यांनी मदत केली. शिबीर यशस्वीतेसाठी कल्पेश पाटील , संजय तडवी , दिवाकर सुरवाडे , समीर तडवी , वैशाली चौधरी, शोभा जावळे , दिपाली पाटील व आशा सेविका यांनी परिश्रम घेतले.

Protected Content