कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग. स. सोसायटी निवडणूक प्रक्रिया लांबणीवर

जळगाव, प्रतिनिधी | ग. स. सोसायटीची निवडणूक प्रक्रीये अंतर्गत मतदार यादी प्रक्रियेला गती मिळालेली असतांना सद्यस्थितीत संसर्ग परिस्थिती लक्षात घेता शिक्षण वा अन्य संस्थेच्या निवडणुका पुढील आदेश येईपर्यंत पुढे ढकलण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

 

जिल्ह्यात जिल्हा सरकारी नोकरांची सोसायटी निवडणूकिसाठी मतदार संघ निहाय यादी प्रक्रिया अमलबजावणी केली जात होती, परंतु, सद्यस्थितीत संसर्ग प्रादुर्भावामुळे रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने जिल्ह्यातील खाजगी व सहकारी संस्थाच्या निवडणुका पुढील आदेश येईपर्यंत स्थगित किंवा पुढे ढकलण्यात येत आहेत, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गुरुवार दि. २० जानेवारी रोजी पारित केले असल्याचे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, लोकमान्य गटाचे ग.स.सोसायटीचे अध्यक्ष विलास नेरकर यांनी ग.स.सोसायटीची निवडणूक संसर्ग प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आली आहे, हे एक प्रकारे सर्वसामान्य नागरिक मतदार, सभासद यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय असल्याचे मत मांडले आहे.

Protected Content