धक्कादायक : केरळ विमान अपघातातील दोन मयत कोरोना पॉझिटिव्ह !

कोझिकोड (वृत्तसंस्था) एअर इंडिया एक्स्प्रेस विमान अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी दोघे करोना पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

 

एअर इंडिया एक्स्प्रेस विमान अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी दोघे करोना पॉझिटिव्ह निघाल्याचे वृत्त इंडिया टिव्हीने दिले आहे. दुबईहून १९१ प्रवाशांना घेऊन आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान केरळमधील कोझिकोडच्या करीपूर विमानतळावर हे विमान रात्री ७.४१ वाजता उतरत असताना धावपट्टीवरून घसरले आणि कुंपणाच्या भिंतीवर आदळून ३० फुटी खड्डय़ात कोसळले. त्यामुळे त्याचे दोन तुकडे झाले. यात भयंकर अपघातात १८ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर २२ जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, आता जखमींच्या नातेवाईकांच्या दृष्टीने धक्कादायक बातमी समोर आली आहे. या अपघातात १८ प्रवाशांपैकी दोन जण करोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.

Protected Content