शेतीकामात अडथळा येणार नाही याची दक्षता घ्या – राजाराम माने

नाशिक – लॉकडाऊन कालावधीत शेतीकामासाठी सवलत देण्यात आली असल्याने शेतीकामात कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही याची दक्षता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी घ्यावी, असे निदे्श विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी पत्राद्वारे दिले आहेत.

कृषी अधिकाऱ्यांनी खरीप हंगामाच्या मान्सुनपुर्व तयारीसाठी शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, किटकनाशके यांचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी व्यवस्था करावी. शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते उपलब्ध करून देताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये. यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. निश्चित केलेल्या सामाजिक अंतराचा व संचारबंदीचा भंग होणार नाही यादृष्टीने नियोजन करावे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

रुग्णालयांनी मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे
श्री. माने यांनी नाशिक विभागातील जिल्हा शल्य चिकित्सकांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. कोविड-19 आजाराच्या पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करताना शासनाने निर्धारित केलेल्या प्रोटोकॉलचे पालन करावे. संशयित, गंभीर आणि इतर रुग्णांवर थ्री टीअर प्रणालीनुसार उपचार करावे. गंभीर रुग्णांबाबत विशेष काळजी घ्यावी असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.

Protected Content