अनियमित धान्य वाटप करणाऱ्या रेशन दुकानदारावर कारवाईची मागणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील रायपूर गावातील रेशन दुकानदार हे नियमितपणे रेशनधान्य वाटप करत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन रायपूर ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच व ग्रामसेवक यांनी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना दिले.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील रायपूर येथील रेशन दुकानदार प्रविण धुमाळ यांच्या नावावर आहे. एका रेशनदुकानातून गोरगरीबांना रेशनधान्य वितरीत केले जाते. दरम्यान रेशन दुकानदार प्रविण धुमाळे हे शासनाकडून मिळणारे रेशन धान्य अनियमितपणे वाटप करीत आहे. गुढीपाडवाच्या आनंदाच्या शिधा अद्यापपर्यंत वाटप केलेली नाही. याबाबत विचारणा केली असता उडवाउडविची उत्तरे दिली. तसेच मी माझ्या मर्जीनुसार रेशन वाटप करेल असे सांगितले. रेशन दुकानदाराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच प्रविण परदेशी आणि ग्रामसेवक जयपाल चिंचोरे यांनी निवेदनातून केली आहे. गुरूवारी १३ एप्रिल रोजी सकाळी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन देण्यात आले.

Protected Content