सहाय्यक फौजदार शिवकुमार ठाकूर यांची सेवानिवृत्ती

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार शिवकुमार बसंराज ठाकुर हे ४० वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतुन ३१ नोव्हेंबर २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले. पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांनी सेवानिवृत्त झालेले शिवकुमार ठाकुर यांचा सत्कार करुन पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शिवकुमार ठाकुर हे १५ मार्च १९८३ या दिवशी पोलिस दलात भरती झाले होते. शिवकुमार ठाकुर यांनी जळगांव, एरंडोल, चाळीसगाव, भडगाव याठिकाणी सेवा बजावली असून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये त्यांनी डिटेक्शन ब्रॅन्च मध्ये देखील सेवा दिली आहे. आज १ डिसेंबर रोजी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये शिवकुमार ठाकुर यांच्या सेवानिवृत्ती बद्द्ल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलिस उपनिरीक्षक राहुल मोरे, योगेश गणगे सह पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी, महिला कर्मचारी या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांनी केले.

Protected Content