अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थांनी तयार केले “इलेक्ट्रिक वाहनासाठी फास्ट बुस्टर चार्जर “

जळगाव प्रतिनिधी । के.सी.ई.अभियांत्रिकी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील इलेक्ट्रिकल शाखेतील तीन विद्यार्थ्यांनी बूस्ट चार्जरची निर्मिती केली आहे.

प्रदूषण कमी करण्याच्या अनुषंगाने भारत सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना मोट्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनाची मागणी ही दिवसेंदिवस वाढत आहे. तरी इलेक्ट्रिकल वाहनांतील बॅटरी चार्जिंगसाठी लागणारा वेळ ही त्यात मोठी अडचण ठरत आहे. त्यावर उपाय म्हणून के.सी.ई.अभियांत्रिकी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील इलेक्ट्रिकल शाखेतील शुभम सराफ, हर्षदा व निलेश ठोंबरे या विद्यार्थांनी बूस्ट चार्जर (फास्ट) ची निर्मिती केली आहे.

या प्रकल्पामध्ये दोन मोड दिले आहेत, यात पहिल्या मोडमध्ये सामान्यता होणारी चार्जिंग होते. दुसऱ्या मोडमध्ये फास्ट चार्जिंग होते फास्ट चार्जिंग मोडमध्ये सामान्यता होणाऱ्या चार्जिंगच्या वेळेपेक्षा किमान २५ टक्के कमी वेळ लागतो. सोबत बॅटरीचे संरक्षण करण्यासाठी ओव्हर करंट प्रोटेक्षण, ओव्हर वोल्टेज प्रोटेक्षण व टेम्परेचर कंट्रोल सुविधा हि पुरवली आहे.

चार्जेर वापरल्यामुळे चार्जिंग साठी लागणाऱ्या वेळेची बचत होणार आहे. या प्रोजेक्ट साठी मायक्रोकंट्रोलर, करंट सेन्सर्स, पॉवर सेमीकंडक्टर स्विच, पॉवर सप्लाय आणि डिस्प्ले हे कॉम्पोनन्ट्स वापले आहेत. या प्रोजेक्ट मध्ये डिस्प्ले वर बॅटरी चार्जिंगची टक्केवारी आणि लागणार वेळ दर्शवले जाते. या प्रकल्पासाठी विद्यार्थाना प्रा. सुशांत सनान्से प्रा. कल्पेश महाजन (विभागप्रमुख) आणि प्राचार्य डॉ. के. पी. राणे यांचे मार्गदर्शन लाभले.

Protected Content