फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाची विनाअनुदानित डी. फार्मसी महाविलयास परवानगी

चोपडा, प्रतिनिधी । महात्मा गांधी शिक्षण मंडळ चोपडा संचलीत श्रीमती शरदचंद्रीका सुरेश पाटील बी.फ़ार्मेसी महाविद्यालयाला विनाअनुदानित डी फार्मसी महाविद्यालयाची परवानगी PCI (फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया) न्यू दिल्ली यांच्याकडून सन २०२०-२१ साठी प्राप्त झाली.
.
बी फार्मसी, एम फार्मसी तसेच पीएचडी चा अभ्यासक्रम पूर्ण क्षमतेने PCI व AICTE न्यू दिल्ली यांच्या परवानगीने कवियेत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत कार्यरत आहे. तसेच महात्मा गांधी शिक्षण मंडळ यांचे अनुदानित तत्वावर महाराष्ट्र शासनाचा ६० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे डी. फार्मसी महाविद्यालय कार्यरत आहे.

औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय चोपडा यांनी नवीन विनाअनुदानित तत्वावर डी फार्मसीसाठी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया न्यू दिल्ली (PCI)यांच्याकडे अर्ज सादर केलेला होता. त्या पार्श्वभूमीवर गेल्या मार्च महिन्यात फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया न्यू दिल्ली यांच्या मार्फत महाविद्यालयाचं इन्स्पेक्शन करण्यात आलेले होते.

महाविद्यालयात उच्च दर्जाचं क्लासरूम व उत्तम प्रतीचे प्रयोगशाळा(लॅब), तशेच प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लायब्ररी आणि सोबत अनुभवी व उच्च शिक्षित पूर्ण क्षमतेने असलेला शिक्षक वर्ग. या सगळ्याबाबींचा विचार करता फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (PCI) न्यू दिल्ली यांनी सन २०२०-२१ करिता ६० विद्यार्थी प्रवेश क्षमतेची परवानगी या महाविद्यालयाला देण्यात आलेली आहे.

ज्या विद्यार्थ्यांना डी फार्मसी साठी आपला प्रवेश निश्चित करायचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज २५ ऑगस्ट पर्यंत भरणे गरजेचे आहे. अद्यापही ज्या विद्यार्थीनी फॉर्म भरला नसेल त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घेण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. गौतम प्रकाश वडनेरे यांनी केले आहे.

ज्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासंदर्भात अडचणी येतात अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने विनामुल्य फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात अली आहे. नवीन डी फार्मसीच्या अभ्यासक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान लाभले.

Protected Content