खारघरमध्ये क्वारंटाईन असलेल्या आरोपीची आत्महत्या

नवी मुंबई वृत्तसंस्था । खारघरमध्ये क्वारंटाईन असलेल्या आरोपीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या महम्मद सुलेमान याने क्वारंटाईन सेंटरमध्येच गळफास घेतला.

तळोजा जेलमधील कैद्यांना कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी खारघरमधील गोखले हायस्कूलमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी अनेक कैदी क्वारंटाईन करण्यात आले आहेत. महम्मद सुलेमान गेल्या चार दिवसांपासून इथे क्वारंटाईन होता. दिल्लीतील ‘एनडीपीएस’ ड्रग्ज प्रकरणातही महम्मद सुलेमान याचा सहभाग होता.

दरम्यान, खारघर पोलीस याबाबत अधिक चौकशी करत आहेत. सध्या पोस्टमार्टमसाठी त्याचा मृतदेह जे जे रुग्णालयात नेला असल्याची माहिती आहे. महम्मद सुलेमानच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Protected Content