इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे गुरांचा चारा जळून खाक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील जळगाव खुर्द शिवारात असलेल्या गोदावरी हॉस्पिटल शेजारील एका शेतात इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतातील २८ हजार रुपये किमतीचा गुरांचा चारा जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात बुधवारी १२ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

नशिराबाद पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कैलास पांडुरंग लढे (वय-५३) रा. जळगाव खुर्द ता. जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे जळगाव खुर्द शिवारातील शेत गट क्रमांक ३८३ येथे गोदावरी हॉस्पिटलचे पाठीमागे शेत आहे. या शेतात त्यांनी गुरांसाठी लागणारा चारा जमा करून ठेवला होता. ५ एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अचानकपणे इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे शेतात आग लागली. लागलेल्या आगीत २८ हजार रुपये किमतीचा गुरांचा चारा जळून खाक झाला. या संदर्भात कैलास पांडुरंग लढे यांनी बुधवार १२ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल भाग्यश्री चौधरी करीत आहे.

Protected Content