आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानतर्फे बाबासाहेबांना अभिवादन

जळगाव, प्रतिनिधी । येथील आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान यांच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महापौर भारतीताई सोनवणे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आल्याने ती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानतर्फे प्रत्येक वर्षी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. परंतु, संचारबंदी असल्याने भीम गीतांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. आज सकाळी आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानचे राजेंद्र भालेराव यांच्या शिवाजी नगर येथील अमर चौकातील निवासस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी नागसेवक कैलास सोनवणे, नवनाथ दारकुंडे, दिपक जोशी आदी उपस्थित होते.

Protected Content