जळगावात गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त; एकावर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सिंगापूर कंजरवाडा येथे एमआयडीसी पोलीसांनी धाड टाकून गावठी हातभट्टी उध्वस्त केली. या कारवाईत ६४ हजारांचा दारूसह मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एकावर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील कंजरवाडा, सिंगापूर या भागात बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू तयार करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि विशाला वाठोरे, स.फौ. रामकृष्ण पाटील, पोहेकॉ संजय भोई, पोहेकॉ संजय धनगर, पो.ना. सचिन मुंढे, पो.कॉ. मुदस्सर काझी यांनी कंजरवाडा येथे सोमवारी १३ एप्रिल रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास कारवाई करत संशयित आरोपी मंगल दिवाणसिंग गुमाने (वय-५२) रा. सिंगापूर, कंजरवाडा हा गावठी हातभट्टीतून दारू तयार करत असल्याचे दिसून आला. त्यांच्यावर कारवाई करत १ हजार २०० रूपये किंमतीचे कच्चे रसायन, २४ हजार रूपये किंमतीचे नवसागर मिश्रीत गुळे व पक्के रसायन, ३६ हजार रूपये किंमतीचे दारू बनविण्याचे कच्चे रसायन आणि ३ हजार ६७५ रूपयांची तयार ३५ लिटर गावठी दारू एका कॅनमध्ये आढळून आली. याप्रकरणी पो.कॉ. मुकेश पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content