आता सकाळी ११ ते ५ वाजेच्या दरम्यानच जीवनाश्यक वस्तूंची खरेदी करता येणार

जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा बंद करण्यात आले आहे. जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी मात्र नागरीक सोशल डिस्टनिंगचा उल्लंघन करत असल्याने जिल्हाधिकारी यांनी किरणामाल दुकाने, भाजीपाला, फळविक्रेते व हातगाडी विक्रेत्यांना विक्री करण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे. यानुसार आता सकाळी ११ ते ५ वाजेच्या दरम्यानच जीवनाश्यक वस्तूंची खरेदी करता येणार आहे. दरम्यान, या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनातर्फे वेळोवेळी आदेश व सुचना देण्यात येत आहे. दरम्यान १४ एप्रिलपर्यंतचा लॉकडाऊन पुन्हा वाढविण्यात आला असून आता ३० एप्रिल पर्यंत राहणार आहे. मात्र दरम्यानच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांना घरीच बसून राहण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. मात्र नागरीक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गैरफायदा आणि मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहे. सोशल डिस्टनिंगचे पालन करत नसल्याने किरणा माल, भाजीपाला विक्रेते, दुध विक्रेते, फळविक्रेते, रस्त्यावर हातगाडीद्वारे विक्री करणारे, फिरते विक्रेते व तत्सम घटकांच्या बाबतीत विक्रीसाठी १५ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान करता येणार आहे. त्यामुळे ठरलेल्या वेळातच विक्रेत्यांनी आपले दुकान लावावयाचे आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास भादवी १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Protected Content