बीएसएनएल कार्यालयासमोरून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव प्रतिनिधी । शहरातील बीएसएनएल कार्यालया समोरून एकाची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, विनय ओमप्रकाश चांडक (वय-४०) रा. टेलिफोन ऑफिस समोर ओमकार नगर हे चांडक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नोकरीला आहे. २४ एप्रिल रोजी सकाळी १० ते (एमएच १५ सीवाय ५३३०) क्रमांकाच्या दुचाकीने आले. दुचाकी हॉस्पिटलसमोर पार्कींग करून  लावली. सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांना दुचाकी जागेवर दिसली नाही. त्यांनी परिसरात शोधाशोध केली असता दुचाकी मिळाली नाही. दुचाकी चोरीस गेल्याप्रकरणी विनय चांडक यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शेखर जोशी करीत आहे. 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.