मारूळ येथे गावठी हातभट्टी पोलीसांकडून उद्ध्वस्त; एकाला अटक

फैजपूर ता. यावल (प्रतिनिधी ) । यावल तालुक्यातील मारूळ येथे नदीकाठी सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर फैजपूर पोलीसांनी धाड टाकून उद्ध्वस्त केले असून एकाला अटक केली आहे. फैजपूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील मारूळ येथील नदी काठी गावठी दारूची हातभट्टी सुरू आल्याची माहिती फैजपूर पोलीसांनी मिळाली. त्यानुसार शनिवार २४ एप्रिल रोजी सायंकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोहेकॉ देवीदास सूरदास, राजेश बराटे, विनोद पाटील, महेंद्र महाजन यांनी हातभट्टीवर धाड टाकत 23 हजार रुपये किंमतीच्या हातभट्टी दारूचे तयार पक्के व कच्चे रसायन नष्ट केले. या प्रकरणी आरोपी उस्मान इस्‍माईल तडवी रा. मारुळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धाडसत्र कारवाईमुळे अवैध दारू तयार करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

Protected Content