यावल येथ शिवभोजन थाली केंद्र वादाच्या भोवऱ्यात : शिवसेनेची चौकशीची मागणी

यावल, प्रतिनिधी । येथील तहसील कार्यालयात आज शिवभोजन थाली योजनेचे प्रस्ताव चुकीच्या व संशयास्पद पद्धतीने मंजूर करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शिवसैनिकांनी या प्रकारावरून तहसीलदार यांची भेट घेऊन याशिवभोजन थाली योजनां त्या मंजूर झालेल्या एका प्रस्तावाची चौकशी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार जितेंद्र कुवर यांना दिले आहे.

शिवसैनिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य शासनाची महत्वकांशी योजना शिवभोजन थाली यावल तालुक्यातील यावल शहर व फैजपूर या दोन शहरांसाठी दोन केंद्र शासनाने मंजूर केली असता तहसीलदार यांनी शिवभोजन थाली घेणाऱ्याचे चुकीचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. तालुक्यातील यावल आणि फैजपूर या शहरांसाठी २१ इच्छुकांनी प्रस्ताव सादर केले होते. मात्र, यासंदर्भात शिवसैनिकांचे म्हणणे आहे की, तहसीलदार आणि त्यांच्या समितीने सदरचे शिवभोजन योजनेच्या आलेल्या प्रस्तावांना अत्यंत घाईगर्दीने मंजूर केल्याचे म्हटले असून समितीने अर्जदारांना या योजनेची केंद्र मिळवण्यासाठी अर्जासोबत कोणकोणत्या कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे याची पूर्वकल्पना दिली होती का ? आपल्या कार्यालयात फक्त एकाच बचत गटाच्या लोकांना बोलवून मंजुरी कशी देण्यात आली असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. यासह अनेक संशयास्पद प्रश्न शिवसैनिकांनी उपस्थित केलेत. यावेळी योजनेच्या समितीद्वारे घेण्यात आलेला निर्णय एकतर्फी आणि अर्थपूर्ण असल्याची शंका व्यक्त केली असून या शिव भोजन थाली योजनेच्या संशयास्पदरित्या देण्यात आलेल्या केंद्र मंजुरी तात्काळ वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी शिवसेनेचे जळगाव जिल्हा उपप्रमुख व परिषद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार साडूसिंग पाटील, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख कडू पाटील, शिवसेनेचे यावल शहर उप प्रमुख जगदीश कवडीवाले, यावल तालुका उपप्रमुख शरद रंगू कोळी तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणाची चौकशी न झाल्यास तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणाचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. या संदर्भातील अधिक माहिती जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील, जळगाव जिल्हाधिकारी, फैजपूर प्रांत अधिकारी यांना पाठवण्यात आली आहे. यावेळी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते पुंडलिक बारी आदि कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

Protected Content