कोरोनावर मात करणारा मेहरूणमधील रूग्ण घरी रवाना

जळगाव प्रतिनिधी । येथील जिल्हा वैद्यकीय रूग्णालयात कोरोना पॉझिटीव्ह म्हणून दाखल झालेला व उपचारानंतर चाचणी निगेटीव्ह आलेला रूग्ण आज आपल्या घरी रवाना झाला आहे.

मेहरूणमधील एक रूग्ण कोरोनाचा संशयित म्हणून दाखल झाल्यानंतर त्याची चाचणी पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली होती. या रूग्णावर शासकीय वैद्यकीय रूग्णालयात उपचार सुरू होते. यानंतर १४ दिवसांनी चाचणी केल्यानंतर तो कोरोना निगेटीव्ह असल्याचे आढळून आले होते. यामुळे प्रशासनाने संबंधीत रूग्णाला बुधवारी डिस्चार्ज देण्याची जाहीर केले होते. यानुसार या रूग्णाला आज शासकीय रूग्णवाहिकेतून घरी रवाना करण्यात आले आहे.

या रूग्णाला आता होम क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे. दरम्यान, या रूग्णाने कोरोनापासून मुक्ती मिळवल्यामुळे आता जिल्ह्यात सध्या तरी कोणताही कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याआधी एका कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाचा मृत्यू झाला असून दुसर्‍या पॉझिटीव्ह रूग्णाने या व्याधीवर मात केली आहे.

कोरोना संसर्ग वार्डात पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार करणार्‍यासाठी शिपमध्ये डॉक्टर, पारिचारिक असे एकूण 36 जणांचा स्टॉप अहारोत्र कार्यरत होता. यात शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉ. किरण पाटील, डॉ. विजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मिलिंद पवार, डॉ. मारुती पोटे, डॉ. दत्तात्रय बिराजदार, विजय पंचलवार, सुयोग चौधरी, अमित भंगाळे, पारिचारिका व कर्मचारी, नेहा चौधरी, रोहन केळकर, शालीनी खानापूरकर, डॉ. प्रसाद, तुषार सोनवणे, गजानन चौधरी, सविता अग्नीहोत्री, जयश्री जोगी, सरला बागुल, नम्रता खानापूरकर, कविता तायडे, सुमित्रा वक्ते, लता त्रिमाली, मनिषा सोळुंखे, शंकुतला सुरवाडे, निलम पाटील यांनी अहारोत्र रुग्णांची सेवा केली.

कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आल्यानंतर मी प्रचंड घाबरलो होतो. पुन्हा बरा होवून घरी परतले, असे वाटले नव्हते. माझे कुटुंबही तणावात होते. मात्र अत्यंत चांगल्या पध्दतीने उपचार झाले, अगदी कुटुंबातील सदस्य समजूनच येथील कर्मचार्‍यांनी माझ्यावर उपचार केले आणि मी 17 दिवसात बरा झालो. माझ्यावर उपचार करणार्‍या डॉक्टर, कर्मचारी माझ्यासाठी देवदूत ठरले. पुर्नजन्म मिळाल्याची भावना असून खूप आनंद होते आहे. माझ्यावर उपचार करणार्‍या सर्व डॉक्टर, सिस्टर व कर्मचार्‍यांसाठी मी खूप खूप आभारी आहे, अशी प्रतिक्रिया संबंधित रुग्णाने बोलतांना व्यक्त केली.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content