मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी – एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील विमानतळाजवळ भरधाव मालवाहू पिकअप व्हॅनने पुढे दुचाकीला धडक दिलयाने दुचाकीस्वार  गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत मालवाहू वाहनावरील चालकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

एमआयडीसी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश रमेश चौधरी (वय-३२) रा. चिलगाव ता. जामनेर जि. जळगाव हे दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दुचाकीने जळगाव-औरंगाबाद महामार्गावरून विमानतळाजवळून जात होते. त्यावेळी त्यांच्या मागून भरधाव वेगाने येणारी (एमएच ४६ एएफ ३८७१) मालवाहू पिकअप व्हॅनने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात धडकेत दुचाकीस्वार अविनाश चौधरी हे गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तर या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अविनाश चौधरी यांच्या जबाबावरून बुधवार १६ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मालवाहू पिकअप व्हॅनवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गफुर तडवी करीत आहे.

Protected Content