प्रभाग ७ मध्ये रस्ते दुरुस्तीच्या कामाला महापौरांच्या हस्ते सुरुवात!

 

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील मुख्य वर्दळीचा रस्ता असलेल्या रिंगरोडच्या दुरुस्तीच्या कामाला सोमवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर पूजा करून नारळ वाढवून कामाचा शुभारंभ झाला.

रिंगरोड दुरूस्ती  कामाच्या शुभारंभप्रसंगी महापौर सौ.भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी, नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेविका सीमा भोळे, नगरसेवक प्रा.सचिन पाटील, मनोज काळे, भारत सपकाळे, प्रभाग समिती सदस्य जगदीश नेवे, मनपा शहर अभियंता अरविंद भोसले, योगेश वाणी, भाजप मंडळ अध्यक्ष केदार देशपांडे, मक्तेदार प्रवीण राणे आदींसह इतर अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

शहराचा मुख्य मध्यवर्ती आणि प्रमुख वर्दळीचा रस्ता असलेल्या रिंगरोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून अमृत योजनेच्या चाऱ्या खोदलेल्या असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सोमवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांच्या हस्ते रस्ते दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली असून मुख्य रस्ता दुरुस्त होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Protected Content