Home Cities जळगाव शिवाजीनगरातील प्रभाग १ मध्ये रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात!

शिवाजीनगरातील प्रभाग १ मध्ये रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात!

0
103


 

जळगाव, प्रतिनिधी । शहरात अमृत आणि भूमिगत गटारींच्या कामामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून सोमवारी प्रभाग १ मध्ये रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. महापौर सौ.भारती सोनवणे यांच्या हस्ते नारळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला. दूध फेडरेशन ते शिवाजीनगरकडे जाणारा मुख्य रस्ता दुरुस्त होणार असल्याने नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.

अमृत योजना आणि भूमिगत गटारींच्या कामामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून प्रत्येक प्रभागातील रस्ते दुरुस्तीसाठी मक्ता देण्यात आला आहे. सोमवारी प्रभाग १ मध्ये दूध फेडरेशनसमोरील साईबाबा मंदिरापासून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीचा महापौर सौ.भारती सोनवणे यांच्या हस्ते पूजा करून आणि नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेविका सरिता नेरकर, नवनाथ दारकुंडे, ऍड.दिलीप पोकळे, भारत सपकाळे, शहर अभियंता अरविंद भोसले आदींसह मनपा अधिकारी, मक्तेदार व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
मुख्य रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.


Protected Content

Play sound