फक्त लस कोरोना संपवू शकत नाही

न्यूयॉर्क,  वृत्तसंस्था  । जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस गेबेरियसस यांनी लसी आल्यानंतर असणाऱ्या परिस्थितीविषयी भाष्य केलं. गेबेरियसस म्हणाले,” करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लस हे महत्त्वपूर्ण साधन असणार आहे, पण त्यामुळे करोनाची साथ संपणार नाही.”

गेबेरियसस यांनी सांगितलं की,”करोनाविरोधात लस हे एक महत्त्वपूर्ण साधन असेल. आम्हाला आशा आहे की, लवकरात लवकर आपल्याकडे ती असेल. आपल्याकडे लस आली तरी आम्ही अशी खात्री देत नाही की, त्यामुळे करोना महामारी संपेल.”

“आपल्याकडे सध्या असलेल्या साधनांचा वापर करून हा विषाणू नियंत्रित करण्यासाठी आणि यापासून एकमेकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी आपल्या दैनदिन जीवनात बदल घडवून आणणं गरजेचं आहे. तथाकथित लॉकडाउनमुळे प्रसार झाला नाही, मात्र लॉकडाऊन हा कोणत्याही देशासाठी दीर्घकालीन उपाय नाही,” असंही ते म्हणाले.

टेड्रोस यांनी जगभरातील सरकारांना आणि लोकांना आवाहन केलं आहे. “प्रत्येक देशातील सरकारनं सार्वजनिक आरोग्यावर अधिक लक्ष द्यावं. त्याचबरोबर लोकांनीही वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्यासंदर्भातील काही गोष्टी कायमस्वरूपी बदलण्याची गरज आहे,” असं आवाहन केलं.

Protected Content