न्हावी येथे सद्गुरु स्मृती महोत्सवाचे आयोजन

faizpur 1

 

फैजपूर प्रतिनिधी । यावल तालुक्यातील न्हावी येथे येत्या दि. २४ डिसेंबर पासून सद्गुरु नीळकंठदासजी यांच्या जन्मशताब्दी निमित्त भव्य ‘सद्गुरु स्मृती’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची जय्यत तयारी सुरु असून देशभरातील संत-महंत या महोत्सवात उपस्थित राहणार आहेत.

या संपूर्ण कार्यक्रमाचे पुर्ण क्षेत्रफळ 140×325 (15 एकर) आहे. त्यामध्ये स्टेज 84 × 45 व महाविष्णु यज्ञ मंडप 125 × 125 व महिला प्रसादालय मंडप 90 × 120 एवढच पुरुष यांचे सुद्धा राहणार आहे. व रसोई घर 90 × 120 रसोई घर उभारण्यात येत आहे. यात एकाच वेळी प्रसाद घेण्यासाठी 3000 हजार लोकांची व्यवस्था करण्यात येणार आहे व कथा श्रवण करण्यास येणारे भावीक एकाच वेळी 10-12 हजार स्त्री पुरुष मंडपात बसू शकतील. डोम असा सभा गृह. तसेच यज्ञ मंडपंध्ये 125 कपल यज्ञासाठी बसतील. या महोत्सव मध्ये आता पर्यत कुठेच झालेला नाही, असा 11 कुंडी महाविष्णु यज्ञ होणार आहे. तसेच या कार्यक्रमात दररोज (सात) दिवस मेडिकल व रक्तदान कँम्प घेण्यात येणार आहे.

सन्मान कार्यक्रम
या महोत्सवात विधवा महिला यांचा सन्मान तसेच पंचक्रोशी मधील साधु संतांच्या माता यांचा सन्मान होणार आहे. तसेच स्वामिनारायण भगवंताचे प्रसादीभूत चरणारविंद आरसच्या कलात्मक छत्रीमध्ये स्थापना करण्यात येणार आहे. या महोत्सवात 5.25 कोटी मंत्रलेखन झालेल्या पोथ्या छत्रीखाली ठेवण्यात आल्या आहे. व 4 वेद, 18 पुराण, ११ उपनिषद, ज्ञानेश्वरी, वचनामृत, भक्तचिंतामणी, सत्संगी जीवन, शीक्षापत्री भाष्य म्हणजे (कुल 31 संहिता पाठी विद्वान संत व ब्राम्हण) करणार आहे. ब्रह्नाभोज (पारायण) होईल.

यांची राहणार उपस्थिती
या महोत्सवात यावल तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या परिवाराला आर्थिक सहाय्य व शहीद सैनिकांच्या परिवाराचा गौरव व सहायता करण्यात येणार आहे. या महोत्सवात उपस्थित अध्यक्ष धर्मप्रसाददासजी (वडताल), उपाध्यक्ष ज्ञानप्रकाशदासजी, तर उद्घाटक हरिप्रकाशदासजी (गांधीनगर), वडताल संस्थेचे चेअरमन देवप्रकाशदासजी, स्वामी ज्ञानजीवनदासजी, स्वामी राघवानंदजी (दिल्ली), शास्त्री नौतमप्रकाशदासजी उपस्थित असतील. निरुपण वेदांत व्याकरणाचार्य भक्तिप्रकाशदासजी करणार आहेत. या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन सद्गुरू शास्त्री धर्मप्रसाददासजी यांनी केले आहे. सद्गुरू स्मृति महोत्सव- 2019 (दि.24 ते 30 डिसेंबर) या कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वामिनारायण गुरुकुल संस्था, सावदा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content