भुसावळ शहरात दुर्गाष्टमीनिमित्त दशामाताची महाआरती

dasha mata

भुसावळ प्रतिनिधी । आषाढी अमावस्या म्हणजेच दीपपुजेची अमावस्याच्या दिवशी खान्देशात अनेक ठिकाणी दशामाता देवीची स्थापना करण्यात येते. याच दिवशी दशामाता पर्वकाल सुरु होत असल्यामुळे 10 दिवसांसाठी दशामाता देवीचे आगमन होत असून भक्तिमय वातावरण तयार होत असते.

याबाबत अधिक माहिती अशी की, या 10 दिवसांमध्ये दशामाता देवीची उत्साहात पूजा- अर्चना केली जाते. येथील अनेक भागामध्ये दशामाता देवीची स्थापना झाली करण्यात आली आहे. याचबरोबर, नगरसेवक राजेंद्र नाटकर यांच्याकडेही भक्तीपूर्ण वातावरणात दशा मातेची स्थापना करण्यात आली आहे. दि. 8 ऑगस्ट रोजी दुर्गाष्टमीनिमित्त राजेंद्र नाटकर यांच्याकडे दशामाताचे महाआरतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नगरसेवक राजेंद्र नाटकर कथा त्यांच्या पत्नी व माजी नगरसेविका शोभा नाटकर यांच्यासह विकास कुर्हे ,परेश शाह, हेमंत ठाकरे, किरण तुपे, पिंटू तुपे, निलेश चीत्ते, गौरव निंबाळे, सुनिल अहिरे, सागर वरके, दिलीप रडे, लखन कुर्हे, दिगंबर कळसकर, रणजित नाटकर, विशाल नाटकर, नितीन नाटकर, मयुर नाटकर, कार्तिक नाटकर, त्रंबक लहू, नाटकर मंजूळा, नाटकर आदी भक्तगण उपस्थितीत होते.

Protected Content