मुंदखेडा येथे क्रिकेट स्पर्धेला सुरुवात

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “आजचा तरुण हा फक्त भ्रमणध्वनी व फेसबुक यूट्यूब गेला असून यामुळे शरीराकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तरुणांनी आता आपल्या शरीरस्वास्थ्यासाठी मैदानी खेळ खेळावे.” असे आवाहन मुंदखेडा येथे क्रिकेट क्लब  आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना संजय गरुड यांनी केले.

अरविंद चितोडिया यांच्या सहकार्यातून संपन्न होत असलेल्या या स्पर्धेत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जळगावचे जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपूत, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी VJNT सेल जिल्हा उपाध्यक्ष अभयसिंग राठोड, मुंदखेडा शाखाध्यक्ष मखिचद राठोड, इम्रान भाई, संतोष राठोड, दिनेश पवार, कैलास सटाले व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंदखेडा येथील कार्यकर्ते पदाधिकारी मंडळी उपस्थित होते.

Protected Content