अमळनेर येथे संत गजानन महाराज मंदिरात वर्धापनदिन व प्रकटदिन कार्यक्रमांचे आयोजन


अमळनेर (प्रतिनिधी) येथील मुंदडानगर जवळील जी.एम.सोनार नगर येथे संत गजानन महाराजांच्या मंदिराचा तिसरा वर्धापन दिवस शनिवारी (२३ फेब्रुवारी) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मंदीरात गणपती, राम ,लक्ष्मण, सिता, विठ्ठल-रूखमीनी व संत गजानन महाराज यांच्या रेखीव मुर्ती आहेत. विद्यार्थ्यांच्या सहली सुद्धा या गजानन महाराज मंदिरामध्ये येत असतात. मंदिराच्या आजुबाजुचा परिसर अत्यंत स्वच्छ असून मंदिरात अशोक महाराज, नितीन भावे , रघुनाथ पाटील सेवा करीत असतात.

या मंदिरामध्ये उत्तर महाराष्ट्रतून मोठ्या संख्येने भाविक असतात, त्यांना या जागृत देवस्थानाबद्दल अनेक अनुभव येत असतात. त्यामुळे अनेक भाविक कोणत्याही कार्यक्रमाला सढळ हाताने मदत करीत असतात. आतापर्यंत मंदीरासाठी बांधकामापासून अनेकांनी मदत केली आहे. मंदिरात वर्धापन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात 23 फेब्रुवारीला दुपारी १.०० वाजता पालखी काढण्यात येणार असून दुपारी ३.०० वाजता महिलांचे सत्संगाचे आयोजन करण्यात आलेले आहे. २५ रोजी सोमवारी सकाळी १०.०० वाजता महाभंडारा कार्यक्रम होणार आहे, तरी भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा. असे संत गजानन महाराज सेवा संस्थानचे अध्यक्ष आर.बी पवार व संचालक मंडळ यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

Add Comment

Protected Content