अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सरपंच संघटनेच्या वतीने १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता मराठा मंगल कार्यालयात तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा मेळावा होणार आहे.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री अनिल पाटील यांच्याहस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच परीषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दादाभाऊ काकडे पाटील हे राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार स्मिता वाघ, डॉ.बी.एस. पाटील, कृषीभूषण साहेबराव पाटील, शिरीष हिरालाल चौधरी यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी अँड विकास जाधव, आनंद जाधव, आबासाहेब सोनवणे, जे. डी. टेमगिरे, राजमल भागवत, सुषमा देसले, बाळासाहेब धुमाळ, श्नीकांत पाटील, सुशांत पाटील, गणेश महाजन, प्रशांत पाटील, युवराज पाटील यांचीही उपस्थिती राहणार आहे. यावेळी तालुक्यातील सर्व सरपंच बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अमळनेर सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष महेंद्र शालिग्राम बोरसे, महीला अध्यक्ष शितल पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख चंद्रकांत पाटील, जिल्हा महीला समन्वयक कल्याणी पाटील, कार्याध्यक्ष कैलास पाटील, तालुका उपाध्यक्ष भास्कर पाटील व सर्व पदाधिकारी सरपंच परीषद मुबई महाराष्ट्र यांनी केले आहे.
यावेळी नुकत्याच झालेल्या लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा सत्काराचा कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच, सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी केले आहे.