Home Cities अमळनेर अमळनेरातून गतीमंद मुलीचे अपहरण

अमळनेरातून गतीमंद मुलीचे अपहरण

0
41


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील एका भागात राहणारी पंधरा वर्षीय अल्पवयीन गतीमंद मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनिवारी ६ मे रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अमळनेर पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील एका भागात १५ वर्षीय मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ती गतीमंद असल्याने तिचा अज्ञानाचा फायदा घेत तिला फूस लावून पळवून नेल्याचे ४ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास समोर आले आहे. दरम्यान, पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही काहीही माहिती मिळाली नाही. अखेर शनिवारी ६ मे रोजी दुपारी ४ वाजता नातेवाईकांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound