गायरान जंगलाला लागलेल्या आगीत ४०० झाडे जळून खाक

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील गलवाडे शिवारातील गट क्रमांक १८७ मधील गायरान जंगलाला अचानक लागलेल्या आगीत बांबु, सिताफळ, आवळा, निंब असे अंदाजे ४०० झाडे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मारवड पोलीसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील गलवाडे शिवारातील गट क्रमांक १८७ मध्ये गायरान आहे. शासनाच्या बिहार पॅटर्नच्या माध्यमातून या ठिकाणी बांबु, सिताफळ, आवळा, निंब अशी अनेक झाडे लावण्यात आलेले आहे. रविवारी २४ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता या गायरान जमीनीला अचानकपणे आग लागली. या आगीत बांबु, सिताफळ, आवळा, निंब अशी ४०० झाडे जळून खाक झाली आहे. शासनाचे जवळपास ३० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सोमवारी २५ मार्च रोजी दुपारी १ वाजता मारवड पोलीस ठाण्यात ग्रामसेवक विजय सखाराम माळी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मारवड पोलीसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ शरीफ खान पठाण हे करीत आहे.

Protected Content