क्रीडा शिक्षक दिलीप संगेले यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल येथील क्रीडा शिक्षक व तालुका क्रीडा समन्वयक दिलीप बिहारी संगेले यांना नुकताच सन २०२३-२४ या वर्षाचा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद जळगाव यांचेतर्फे जिल्हास्तरीय महात्मा जोतीराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पी.एन.लुंकड विद्यालय जळगाव येथे ११ रोजी शिक्षक आमदार किशोरजी दराडे व डाँ.झोपे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आलेला हा पुरस्कार दिलीप संगेले हे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सांगली येथे असल्याने प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील यांनी स्वीकारला. दिलीप बिहारी संगेले हे क्रीडा क्षेत्रात उत्तम प्रकारे कर्तव्य बजावत असल्याकारणाने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. संगेले यांनी सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद जळगाव यांच्यातर्फे २८ नोव्हेंबर राष्ट्रपिता ज्योतिराव फुले स्मृती दिनाचे औचीत्य साधुन गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिलीप संगेलेसर यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील, व्हा.चेअरमन शैलेजा पाटील, सचिव मनीष पाटील संचालीका पूनम पाटील, प्राचार्य अशोक पाटील, उप प्राचार्या राजश्री अहिरराव व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक करत अभिनंदन केले.

Protected Content