कूलरमधील विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू

अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे राज्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी उकाड्यात देखील वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक या वातावरणातील सततच्या बदलामुळे हैराण झाले आहे. अशातच कूलरला प्रधान्य दिले जात आहे. या कुलरमुळे अकोलामध्ये विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घरात लावलेल्या कूलरमधील विजेचा धक्का लागल्याने या इसमाचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

नितीन गजानन वानखेडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते कामावरून घरी परतले असता, घरातील कूलर बंद पडला होता. त्यांनी कूलर चालू करण्याचा प्रयत्न केला, परंतू कूलरचा स्पर्श करता त्यांना विजेचा धक्का बसला आणि कूलर त्यांच्या अंगावर पडला. ही घटना त्यांचे वडील आणि पत्नीला लक्षात येताच त्यांनी घरातील विद्युत पुरवठा बंद केला आणि नितीन यांना उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले. दरम्यान वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

Protected Content