किरकोळ कारणावरून दोघांवर लोखंडी सुऱ्याने वार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शहरातील नशिराबाद येथे किरकोळ कारणावरून एकाने दारूच्या नशेत हातात लोखंडी सुराने वार करून दोन जणांना जखमी केल्याची घटना  सोमवारी ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सुमारास घडला आहे. या प्रकरणी रात्री ८ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, राकेश विजय नाथ (वय-२०) रा. पेठ भाग, नशिराबाद ता.जि.जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता राकेश नाथ हा त्याच्या घरी बसलेला असताना गावात राहणारा रोहित दिलीप नाथ रा. पेठ भाग नशिराबाद हा दारूच्या नशेत असतांना हाता लोखंडी सुरा घेवून आला. किरकोळ कारणावरून राकेश विजय नाथ याच्यावर वार केले, त्याच्यानंतर राकेशचे मामा ज्ञानदेव हिरामण नाथ हे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांना देखील मारहाण करत दुखापत केली. तसेच दोघांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर राकेश नाथ याने नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार रात्री ८ वाजता संस्थेत आरोपी रोहित दिलीप नाथ रा. पेठ भाग नशिराबाद ता. जि.जळगाव याच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार हरीश पाटील करीत आहे.

Protected Content