महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील राजमालती नगरातील दूध फेडरेशन जवळ राहणाऱ्या एका महिलेच्या घरात घुसून तिच्याशी अश्लील कृत्य करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील राजमालती नगर परिसरात २२ वर्षीय महिलाही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी ११ डिसेंबर रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास  महिला एकटी घरी असतांना  परिसरात राहणारा संशयित आरोपी कमलाकर साहेबराव अहिरे (वय-३७) रा.राजमालती नगर, दूध फेडरेशनच्या मागे, जळगाव याने घरात घुसून महिलेशी अश्लिल कृत्य करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी कमलाकर साहेबराव अहिरे यांच्या विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ वीरेंद्र शिंदे करीत आहे.

Protected Content