मतदान केंद्रात अडथळा निर्माण करणाऱ्यावर कारवाई

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तहसील कार्यालयात येथे मतदान केंद्रात झोनल अधिकारी तथा तहसीलदारांशी एकाने वाद घालून मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण केल्याची घटना घडली आहे. संबंधितावर गुन्हा दाखल करण्याबाबत तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल खताळ यांना पत्र दिले आहे.

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी ३० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेपासून मतदानाला सुरुवात करण्यात आली. या अनुषंगाने धरणगाव तहसील कार्यालयातील मतदान केंद्र क्रमांक ७६/३३८ येथे मतदान प्रक्रिया सुरू असताना मतदान कक्षामध्ये गर्दी दिसून येत असल्याने झोनल ऑफिसर तथा तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी मतदान केंद्रात जाऊन ‘मतदान कक्षाच्या बाहेर उभे रहा’, असे सांगितले. या रागातून प्रवीण समाधान बोरसे रा. हेमहिंदू नगर धरणगाव, याने तहसीलदार देवरे यांच्याशी वाद घातला. तसेच मतदान कक्षातून बाहेर न जाता मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण केला. या संदर्भात झोनल ऑफिसर तथा तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल खताळ यांना पत्र पाठवून प्रवीण बोरसे याच्यावर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १३१ व १३२ अन्वये गुन्हा दाखल करावा अश्या सुचना देण्यात आली आहे.

Protected Content