Home Cities जामनेर बंजारा महाकुंभात ना. गिरीशभाऊ महाजन यांचा हृद्य सत्कार

बंजारा महाकुंभात ना. गिरीशभाऊ महाजन यांचा हृद्य सत्कार

0
157


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गोद्री येथे सुरू असलेल्या बंजारा, लबाणा-नायकडा महाकुंभाच्या यशस्वी आयोजनासाठी अहोरात्र परिश्रम केल्याबद्दल ना. गिरीश महाजन यांचा आज धर्मपीठातर्फे हृद्य सत्कार करण्यात आला.

आज गोद्री येथील बंजारा, लबाणा-नायकडा समाज महाकुंभाचा समारोप होत असून विविध मान्यवरांची मांदियाळी या कार्यक्रमाला जमले आहेत. यात महाकुंभाच्या आयोजनासाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले अशा मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यात जामनेर येथील सदगुरू आश्रमाचे प्रमुख शामचैतन्य महाराज यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांचा योगी आदित्यनाथ आणि बाबा रामदेव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ना. गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने बंजारा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले असून याच्या यशस्वीतेसाठी त्यांनी परिश्रम घेतले आहे. लक्षणीय बाब म्हणजे गेल्या सात दिवसांमध्ये ते कधीही धर्मपीठावर उपस्थित नव्हते. याचाच उल्लेख करत त्यांचा हृद्य सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.


Protected Content

Play sound