शेतकऱ्याच्या शेतातून ठिंबक नळ्यांची चोरी; जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जामनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील वाडी किल्ला ते वाघारी दरम्यानच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी ठिबक नळींचे बंडल चोरून नेण्याचे घटना घडली आहे. याबाबत शनिवारी ११ मार्च रोजी दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांवर जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जामनेर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संदीप मोतीलाल सरताळे (वय-४२, रा. वाघारी ता. जामनेर) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेती करून आपला ते उदरनिर्वाह करतात. त्यांचे वाडीकिल्ला ते वाघारी दरम्यान असलेल्या रोडवर शेत गट क्रमांक १०९ येथे शेत आहे. दरम्यान ८ मार्च ते ११ मार्च दरम्यान आज्ञत चोरट्यांनी त्यांच्या शेतात ठेवलेले ७५ हजार रुपये किंमतीचे ठिबक निळ्यांचे बंडल चोरट्यांनी चोरून नेले. हा प्रकार घडल्यानंतर शेतकरी संदीप सरताळे यांनी परिसरात संपूर्ण शोध घेतला. परंतु याची कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर शनिवारी ११ मार्च रोजी दुपारी २ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जनार्दन सोनवणे करीत आहे.

Protected Content