डांगरी येथे वाळू वाहतूक करणारे वाहन पकडले

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील डांगरी शिवारातील नदीपात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या चार चाकी वाहनावर महसूल पथकाने कारवाई केली असून वाळूने भरलेले वाहन पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात शनिवारी ११ मार्च रोजी सायंकाळी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील डांगरी शिवारातील नदी पात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती डांगरी येथील तलाठी गणेश गोरख पाटील यांना मिळाली. त्यानुसार शनिवारी ११ मार्च रोजी सकाळी १० वाजता पथकासह कारवाई करण्यासाठी रवाना झाले. महसूल पथकाने पोलीसांच्या मदतीने कारवाई करत महिद्रा पिकअप व्हॅन क्रमांक (एमएच ४७ ई २१३८) वाहन जप्त केले. वाळू वाहतूकीबाबत कोणताही परवाना नसल्याचे आढळून आले.  तलाठी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालक विलास राजाराम बेलदार (वय-४९) रा. डांगरी ता.अमळनेर याच्या विरोधात मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल तेली करीत आहे.

Protected Content